आज आपला शेतकरी बांधव पिढ्यानपिढ्या कमी होत जाणारी शेतजमीन,पाऊसाची अनियमितता,प्रत्येक वर्षी येणारे नवनवीन रोग मग त्यांच्यासाठी येणारा अमाप खर्च,रासायनिक खतांचा पूर्वनियोजित तुटवडा प्रत्येकवर्षी खतांचे वाढणारे भाव, बी-बियाणांमध्ये फसवणूक, विजेचा तुटवडा, अवर्षण , दुष्काळ, गारपीट एवढया संकटांना तोंड देऊन आपल्या कृषिप्रधान देशामधील शेतकरी पिचून गेलाय.
बर एवढी संकट काही कमी आहेत का..?
तरीसुद्धा आपल्या शेतकरी बांधवाणी या संकटांना मात देऊन कष्टाने पिकवलेल्या धनधान्याला बाजरपेठेत कमीतकमी हमीभाव सुद्धा भेटेल का नाही हे सांगता येणार नसत. आज चढ्या दराने विकला जाणारा शेतीमाल उद्या लगेच मातीमोल होतो..
मग सांगा एवढे मोठे प्रत्येक वर्षीचे अनुभव पाठीशी असताना आणखी किती वर्षे पुढच्या वर्षी काही उत्पन्न निघेल अशी अपेक्षा शेतीतून ठेवायची..
म्हणून, आज कुठे तरी आपण कमीत कमी शेतीपुरक व्यवसायाकडे तरी ओळायला हव. तरच आपण आणि येणारी पिढी शेतीत किंवा या जागतिक स्पर्धेत कुठे तरी टिकून राहू.
मग शेळीपालनच व्यवसाय का करावा ?
कारण, आपण कोणताही उद्योग -व्यवसाय उभा करू शकतो. पन असा उद्योग हा 100% यशस्वी होण्यासाठी त्या उद्योगातील उत्पादनाला बाजारपेठेत असणारी मागणी महत्वाची असते. आणि तरच ते उद्योग वर्तमानासहित भविष्यात टिकणारे असतात. कारण Demand and Supply (मागणी आणि पुरवठा )च्या नियमानुसार बजारपेठात आपण सुरू केलेल्या उत्पादनाला मागणी असेल तरच त्याला दर ही चांगला भेटतो आणि भविष्यात असे उद्योग निरंतर सुरू राहतात. मग या नियमा प्रमाणे आपण शेळीपाळणामद्धे पाहिल तर आज देश्यामध्ये बोकडांच्या मटणाचे आणि शेळ्या चे दर सतत वाढत आलेले आहेत .तुम्ही खालील नाबार्ड ने दिलेल्या आकडेवारी च्या चार्ट मध्ये पाहू शकता.
1998 पासून 2020 पर्यंत चा हा चार्ट आहे. या चार्ट मध्ये लाल रेष ही बोकडांची आणि शेळयांची असणारी मागणी दर्शवते तर निळी रेष देशा मध्ये वाढत असणार शेळीपालन दर्शवते. तर तुम्ही 2020 या वर्षी पाहू शकता शेळीपालण आणि असणारी मागणी या मध्ये किती मोठा फरक आहे. थोडक्यात या वरुन अस लक्षात येत आजघडीला सुरू असणाऱ्या शेळीपालणपेक्षा देशामध्ये मागणी ही 3 ते 4 पटीने जास्त आहे. आणि याच कारनास्थव आजतागायत सुद्धा बोकडांचे आणि शेळयांचे दर सतत वाढत आहेत. म्हणून शेळीपालण हा व्यवसाय वर्तमानात आणि भविष्यातही शास्वत आहे. त्यामुळे आपण जर योग्य मार्गदर्शन घेतल तर शेळीपालनामद्धे 100% यशस्वी होणार आहे. आणि त्यासाठीच आम्ही शेळीपालणाची पंचसूत्री हा एक परिपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम online कोर्स च्या माध्यमातून घेऊन आलो आहे.